उपक्रम

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान

कुठले हि कार्य म्हणाले तर त्या सुरवातीस किंवा त्या शुभारंभाला कुठलीतरी प्रेरणा आवश्यक असते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्टानच्या स्थापनेला लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब (कृषिमंत्री, भारत सरकार ) यांची राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्य्कीर्द प्रेरानादाई ठरलेली आहे. प्रतिष्टानची दुसरी प्रेरणा परंपरेने घरातूनच मिळाली. ज्या समाजात आपण राहतो त्यचे थोडे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. या भावनेने माझे आजोबा स्व. सुखलाल खाबिया , वडील मोहनलाल खाबिया, चुलते स्व. जुगराज खाबिया यांनी कार्य केले. त्याला आई स्व. रत्नप्रभा खाबिया व मामा श्रीपाल मुठा यांचा पाठींबा होता. प्रतिष्टान स्थापन करताना क्रीडा व सांस्कृतिक या दोन गोष्टीवर आधारित कार्यक्रम घेण्याचे व विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले होते.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्टानची स्थापना दि. २५ डिसेंबर १९९७ रोजी मा. शरद पवार यांचा हस्ते झाली. २०११ च्या डिसेंबरमध्ये प्रतीष्टनला १४ वर्षे पूर्ण झाली. न्रत्य, संगीत, नाट्य, वादन, चित्रकला, गायनकला, इत्यादीमुळे जीवन संपन्न होते, जीवनात बहुश्रुतता एते, मन आनंदित होते, तर क्रीडेच्या मैदानी प्रकारामुळे तन सद्रुड बनून अंगी सामर्थ्य येते.सुरवातीला केवळ सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रम करण्याचे धेय्य प्रतीष्टानाने डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र नंतर समाजाच्या दृष्टीने गम्बीर आणि घातक ठरलेल्या काही सामाजिक प्रश्नासंबधी जागरुकता निर्माण करण्याच्या संदर्भात काही स्पर्धांचे आयौजन करण्याबाबत वूचार आला .